Still loading
Almost there
Taking longer than usual - probably a slow connection. A quick retry usually fixes it.
Your account and purchases are safe.

मनातलं महाभारत आणि घरातील रामायण
प्रत्येक माणसाच्या मनात एक महाभारत सुरू असतं आणि प्रत्येक घरात एक रामायण घडत असतं. रामायण आणि महाभारतातील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून हे पुस्तक मानवी स्वभावाचा, नात्यांचा आणि मानसिक संघर्षांचा वेध घेतं. प्रेम, अपेक्षा, संशय, अहंकार, विश्वासघात आणि कौटुंबिक कलह यांचे विविध पैलू यात उलगडले आहेत. राम, सीता, कैकेयी, रावण, कृष्ण, द्रौपदी, कर्ण आणि भीष्म यांच्या व्यक्तिरेखांकडे आजच्या सामाजिक आणि कौटुंबिक वास्तवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. घरातील राजकारण, भावंडांमधील संघर्ष, संपत्तीचे वाद, स्त्रीचे स्वातंत्र्य, नात्यांमधील दुरावा, सत्ता आणि अन्याय अशा अनेक विषयांवर हे पुस्तक विचार करायला लावतं. हे केवळ पौराणिक कथांचं वर्णन नाही, तर आपल्या आजूबाजूच्या माणसांचं आणि स्वतःच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक प्रकरणातून वाचकाला एखादं परिचित नातं, एखादी जुनी जखम किंवा स्वतःच्या आयुष्यातील एखादा प्रसंग नव्याने समजण्याची संधी मिळेल. कारण काळ बदलला, माणसांची जीवनशैली बदलली, तरी मानवी स्वभावातील संघर्ष आजही कायम आहेत. महाभारत आणि रामायण संपलेली नाहीत; ती आजही आपल्या मनात आणि घरात वेगवेगळ्या रूपांत घडत आहेत.